Surprise Me!

एल्फिन्स्टनचा पूलाचे बांधकाम भारतीय लष्कराच्या हाती. | Lokmat Latest News

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन पुलाचे बांधकाम भारतीय लष्‍कर करणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी याबात ट्विटवरून माहिती दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत युद्धपातळीवर पूल बांधण्याचे प्रशिक्षण मिलिटरी इंजिनीअरिंग विंगला दिलेले असते. राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीतील पूल पडला होता. त्‍यावेळी मिलिटरी इंजिनीअरिंग विंगच्या पथकाने त्‍या पुलाचे बांधकाम खूप कमी वेळेत केले होते. लष्‍काराचे हे काम लक्षात घेऊन, एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे या स्टेशनांवर वेगाने पूल बांधण्यासाठी लष्कराने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आशीष शेलार यांनी केले होते. त्यांनी याबाबत संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना तशी विनंती केली होती. या दोघांनीही आपली सूचना मान्य केल्याची माहिती आशीष शेलार यांनी ट्विट करून दिली आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon